[aurangabad-maharashtra] - बदल्या प्रकरणात दोषींवर कारवाई करा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षक बदलीतील झालेल्या अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, यामागणीसाठी जिल्हा परिषद शिक्षक कृती समितीने बुधवारी (५ सप्टेंबर) विभागीय आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन केले.
यावेळी कृती समितीने विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ च्या शिक्षक बदली धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना नियमांची पायमल्ली केली आहे. बदली प्रक्रियेत उच्च न्यशायालयाने दिलेल्या निदर्शेचाचे पालनही झालेले नाही. या बाबींसंदर्भात वारंवार जिल्हा परिषद व पंचायत समिती शिक्षण विभागाकडे अनेकदा निवेदने दिले. मात्र, प्रशासनाने याची दखल घेतली नाही. २९ मे २०१८ रोजी जिल्हातील चार हजार शिक्षकांच्या बदल्याचे थेट आदेश काढताना नियमांचे पालन न झाल्याने मराठवाड्यातील शिक्षकांवर अन्याय झाला आहे. बोगस लाभार्थ्यांमुळे शेकडो शिक्षक विस्थापित झाले आहेत. बदली प्रक्रियेतील अनियमितता तसेच बोगसगिरी संदर्भात शेकडो शिक्षकांनी शिक्षणाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे अर्जाद्वारे तक्रारी करून दाद मागितली आहे. मात्र, शिक्षण विभाग तक्रार अर्जाची दखल न घेता प्रकरण दडपत असल्याचे कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शिक्षकांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, नियमबाह्य केलेल्या बदल्या रद्द कराव्या यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/GNnWOAAA