[aurangabad-maharashtra] - वाळूचोरीमुळे जिल्हाधिकारी हतबल

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात महसूल प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहेत. चोरट्या मार्गाने वाळू उपशाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासूनचा आहे. आता यात आपण काय करणार, थेट समोर जाऊन कारवाई कशी करणार. यासाठी डोक्याने काम करावे लागणार आहे, असे हताश उद्गार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना काढले.

जिल्ह्यात वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासनाचे सर्व उपाय फसले आहेत. ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीसाठी जिल्ह्यात ३१ वाळूपट्ट्यांची लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, यातील केवळ दोन लहान वाळूपट्ट्यांना प्रतिसाद मिळाला. उर्वरित पट्ट्यातून वाळू उपसा करण्याची परवानगी नसताना औरंगाबाद तसेच जालना जिल्ह्यातून चोरी करून वाळू सर्रास शहरात आणली जात आहे. शिवाय महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडाला आहे. यावर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आपण यावर लवकरच कारवाई करणार असल्याचे सांगितले. ठेकेदार वाळूपट्ट्यांना प्रतिसाद देत नाही, काय करावे ते कळत नाही. महसुलाचे टार्गेट पूर्ण होत असले, तरी येणाऱ्या कालावधीत वाळूचोरांची थेट वाहने जप्त करून दंड आकारणे तसेच दोन वेळेस पकडलेल्या वाहनांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खदानीतील उपसा आणि वाळूचोरी वर्षभरात बंद होईल. त्यानंतर १० वर्ष त्याचा परिणाम राहील असा दावा चौधरी यांनी केला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/eQCJbwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬