[aurangabad-maharashtra] - संकेत कुलकर्णी खूनप्रकरणी आरोपीचा जामीन फेटाळला

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात २३ मार्च २०१८ रोजी झालेल्या संकेत कुलकर्णी या युवकाच्या निर्घृण खूनप्रकरणात कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपी संकेत संजय मचे या आरोपीने कोर्टात सादर झालेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी बुधवारी (५ सप्टेंबर) फेटाळला.

या प्रकरणात विजय कडुबा वाघ (२०, रा. जयभवानीनगर) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, शहरातील युवक संकेत कुलकर्णी याला कारखाली चिरडून त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी संकेत संजय मचे (२२, रा. देवळाई परिसर) याने कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला होता. त्या अर्जावरील सुनावणीवेळी, आरोपीचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग आहे व घटनेवेळी आरोपी तिथे हजर होता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनीही आरोपीचे नाव सांगितले आहे. तसेच आरोपीला जामीन मंजूर केल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो किंवा पुरावाही नष्ट करू शकतो. त्यामुळे आरोपीचा नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटा‍ळला. जिल्हा सरकारी वकील देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/JGfi5QAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬