[dhule] - धुळे आरटीओ कार्यालयात मुंबई पथकाकडून चौकशी

  |   Dhulenews

नागरिकांच्या तक्रारीनंतर धडक कार्यवाही

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नेहमीच वादात सापडत असलेल्या येथील धुळे प्रादेशिक परिवहन म्हणजेच आरटीओ कार्यालयात मुंबई येथील दक्षता विभागाच्या पाच अधिकाऱ्यांचे एक पथक चौकशीसाठी दाखल झाले आहे.

मुंबईतील अधिकाऱ्यांनी आज अचानक धाड टाकून ही कारवाई केली. या कारवाईत काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी तर कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. काही गाडी मालकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. अचानक पडलेल्या या धाडीमुळे आरटीओ कार्यालयात खळबळ उडाली आहे. दिनेश फुलचंद परदेशी, विजय पाटील (दोघे रा. धुळे) यांनी काही दिवसांपूर्वी परिवहन आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. येथे गाड्या पासिंग करताना पैशांची मागणी होते. सरकारी शुल्का व्यतिरिक्त अधिकचे पैसे घेण्यात येतात. आरटीओ अधिकारी येथे थांबत नाहीत, यासह अन्य तक्रारी यामध्ये त्यांनी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत बुधवारी दुपारी अचानक परिवहन विभागातील दक्षता विभागाच्या (व्हिजिलन्सच्या) पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने धुळे आरटीओ कार्यालयात धाड टाकली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/CgjZSAAA

📲 Get Dhule News on Whatsapp 💬