[jalgaon] - गाळेधारकाच्या विषयांत आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

  |   Jalgaonnews

थकबाकीसाठीच्या मुदतीचे दोनच दिवस शिल्लक

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना थकीत भाडे भरण्यासाठी आयुक्तांनी १५ दिवसांची मुदत दिली. या मुदतीतील १३ उलटूनही गाळेधारकांनी अद्याप थकबाकी रक्कमा न भरल्याने दोन दिवसानंतर आयुक्त काय भूमिका घेतात याकडे गाळेधारकांसह जळगावकरांचे लक्ष लागून आहे.

मनपा मालकीच्या १८ व्यापारी संकुलातील २३८७ गाळ्यांची मुदत संपुष्टात आली आहे. गेल्या ६ वर्षांपासून गाळ्यंचा प्रश्‍न प्रलंबित आहेत. औरंगाबाद खंडपीठाने गाळे ताब्यात घेऊन कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश दिले आहे. मात्र, प्रशासनाकडून कारवाईला दिरंगाई केली जात आहे. दरम्यान, १२ दिवसांपूर्वी आमदार सुरेश भोळे यांच्यासह गाळेधारकांच्या शिष्टमंडळांनी आयुक्त चंद्रकांत डांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. आयुक्त डांगे यांनी थकीत भाडे भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. दिलेल्या मुदतीनुसार केवळ २ दिवस उरले आहेत. तरी एकाही गाळेधारकांनी थकीत भाडे भरलेले नाही. त्यामुळे दोन दिवसानंतर आयुक्त काय भूमिका घेतात? याकडे आता लक्ष लागले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/DAZfuAAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬