[jalgaon] - जळगावः वर्गणीसाठी देणगीदाराची 'ही' अट

  |   Jalgaonnews

जळगाव

गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर आलं असल्यानं अनेक ठिकाणी वर्गणी गोळा करणं सुरू झालं आहे. परंतु, जळगावमधील जामनेरच्या जडे बंधू ज्वेलर्सनी वर्गणी मागण्यासाठी आलेल्या मंडळाच्या सदस्यांना वर्गणीसाठी एक अटक घातली आहे. ही अट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. गणपतीची वर्गणी हवी असेल तर मंडळाच्या सदस्यांना ३० पर्यंतचे पाढे यायला हवेत असं जडे बंधूं ज्वेलर्सचं म्हणनं आहे.

गणपतीची वर्गणी मागण्यासाठी मंडळातील ज्येष्ठ नागरिकांसह बच्चे कंपनीचाही मोठा उत्साह पाहायला मिळतो. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मोठ-मोठ्या मंडळासह बच्चे कंपनीचे सुद्धा वेगळे मंडळ व छोटासा बाप्पा असतो. यासाठी ते अनेक ठिकाणी वर्गणी मागायला जात असतात. अशावेळी बच्चे कंपनीचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असते. हीच बाब लक्षात घेवून जडे बंधू ज्वेलर्सने गणपतीची वर्गणी मागायला येणाऱ्या बालमित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना वर्गणी हवी असल्यास ३० पर्यंत पाढे येणे गरजेचे असल्याची 'अट' घातली आहे. गणपती उत्सवात विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये. त्यांनी या काळातही अभ्यास करावा, हा हेतू या अटीमागचा असल्याचे त्यांनी सांगितले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Vqe9RwAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬