[jalgaon] - राष्ट्रीय महामार्ग सहाचे काम बंद!

  |   Jalgaonnews

आर्थिक वादाने हजारो मजूर बेरोजगार

...

पंकज काकुळीद, धुळे

सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नवापूर ते अजंगदरम्यानच्या रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद झाले आहे. यामुळे सुमारे एक हजारांहून अधिक मजुरांना आपल्या गावी परत पाठवून देण्यात आले आहे, अशी माहिती महामार्गाचे काम करणाऱ्या ‘जीएचव्ही’ या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाकडे महामार्गाच्या कामबंदबाबत कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याचे प्रकल्प संचालकांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. हा सर्व प्रकार पाहता राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला मूळ ठेकेदार कंपनी व काम करणारी सब जीएचव्ही ठेकेदार कंपनी यांच्या आर्थिक वादामुळे विलंब होणार आहे.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून सुमारे १४० किमी. अंतरावरून सुरत-नागपूर राष्ट्रीय महमार्ग क्रमांक सहाचे गेल्या दीड वर्षापासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामाचे मूळ ठेकेदार मुंबई येथील ‘आयएल ॲण्ड एफएस’कडून ‘जीएचव्ही’ या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. सुमारे अडीच हजार कोटींपेक्षा रुपयांपेक्षा अधिक हा ठेका असून, दीड वर्षाच्या कालावधीनंतर महामार्गाचे काम आता दोन्ही कंपनीच्या आर्थिक वादामुळे बंद पडले आहे. कंपनीकडे जिल्ह्यासह परराज्यातील सुमारे एक हजाराहून अधिक मजूर काम करीत होते. मात्र, काम बंद झाल्यामुळे मजुरांनादेखील आपापल्या गावी परत पाठविण्यात आले आहे. तर येत्या काही दिवसांत कंपनीचे अधिकारीदेखील माघारी जाण्याच्या तयारीत असल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/6KZ1xwAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬