[jalgaon] - विसर्जनासाठी ‘पुणे पॅटर्न’

  |   Jalgaonnews

गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय; महापालिका यंत्रणेची साथ

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

पुण्यात मानाच्या गणपतीनंतर इतर सर्व गणपतींचे विसर्जन होत असते. तसेच त्या ठिकाणावरील विसर्जन मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध असल्याने त्याची संपूर्ण राज्यभरात चर्चा होते. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवर ‘पुणे पॅटर्न’ राबवित जळगावातील गणपतींची विसर्जन मिरवणूक करण्याचा निर्धार महापालिकेत आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आला. गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासूनच महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित राहणार असल्याचे आश्‍वासन महापलिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले.

महापालिका प्रशासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची व शहरातील सर्व सामाजिक संस्थांची आढावा बैठक महापालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी व्यासपीठावर आयुक्त चंद्रकांत डांगे, महामंडळाचे सचिन नारळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी, मल्टिमीडियाचे सीईओ सुशील नवाल, सुभाष मराठे उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/4mlwfwAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬