[kolhapur] - उच्च ध्वनियंत्रणा लावल्यास फौजदारी

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी,

'गणेशोत्सवकाळात उच्च ध्वनियंत्रणा लावू नये. ही यंत्रणा असलेल्या मालकांनी आणि लावू इच्छिणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. आदेशाचे उलंघन करणाऱ्यांविरोधात गंभीर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील,' असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, उच्च ध्वनियंत्रणेमुळे दुष्परिणाम होतात. यापूर्वी एका आजारी रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवात कोणत्याही परिस्थितीत मोठ्या आवाजाची ध्वनियंत्रणा लावू दिली जाणार नाही. उच्च ध्वनियंत्रणा असणारे मालक, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी १३ ते २४ सप्टेंबरपर्यंत यंत्रणा आपल्या ताब्यात सीलबंद ठेवाव्यात. आगामी गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळे गणेश आगमनावेळी आणि विसर्जन मिरवणुकीत उच्च ध्वनियंत्रणा लावतात. ध्वनी प्रदूषण करतात. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही मंडळास उच्च ध्वनियंत्रणा लावू दिली जाणार नाही. ऐनवेळी मंडळाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी दबाव आणून उच्च ध्वनियंत्रणा लावण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी पोलिस व मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होतो. त्यामुळे आगमन, विसर्जन मिरवणुकीत अशी ध्वनियंत्रणा आणू नये. आणल्यास ती लावणारे मालक, चालक, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/4yCNJAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬