[kolhapur] - कसबा बावडा येथे पाण्यासाठी रास्ता रोको
म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा
येथे गेल्या पाच दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याच्या निषेधार्थ येथील धनगर गल्ली, अतिग्रे गल्ली, ठोंबरे गल्लीसह अन्य ठिकाणच्या महिलांनी मुख्य मार्गावर धनगर गल्लीसमोर दीड तास रास्ता रोको केला. यावेळी जलअभियंता सुरेश कुलकर्णी व उपजलअभियंता राजेंद्र हुजरे यांनी भेट देऊन नेहमीच्या शैलीत आश्वासन देत सुटका करून घेतली. यावेळी भागातील नगरसेविका माधुरी लाड यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
अलंकार हॉलसमोरील पाण्याच्या पाइपच्या झडपा खराब झाल्यामुळे शुक्रवारपासून सोमवारपर्यंत तेथील काम सुरू होते. त्यामुळे कसबा बावडा भागात पाणीपुरवठा अत्यंत कमी झाला होता. त्यामुळे त्याचे पडसाद बुधवारी सकाळी अकरा वाजता उमटले आणि महिलांनी स्वतः पुढाकार घेत रास्ता रोको केला. दीड तास रास्ता रोको केल्यामुळे रस्त्याच्या दोनही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आयुक्त आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. मात्र, जलअभियंता कुलकर्णी यांनी धनगर गल्ली येथे नवीन व्हॉल्व्ह बसवू, असे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1NljVwAA