[kolhapur] - तीर्थक्षेत्र विकास आराखडा राज्य सरकारकडे

  |   Kolhapurnews

पहिल्या टप्प्यातील ८७ कोटींच्या कामासाठी लवकरच निविदा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बहुचर्चित अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर करुन मंगळवारी महापालिकेला सादर केला. त्यानंतर मंजूर आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील ८७ कोटी १७ हजार ७७५ रुपयांचा आराखडा बुधवारी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारला सादर केला. राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामाला सुरुवात होणार आहे. तीन टप्प्यातील एकूण २५५ कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामासाठी राज्य सरकारने यापूर्वीच अर्थसंकल्पामध्ये ८० कोटींची तरतूद केली आहे.

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षाला लाखो भाविक गर्दी करतात. मात्र मंदिर परिसरात भाविकांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पायाभूत सुविधांचा बोजवारा उडत आहे. मंदिरासभोवतालचे रस्ते, पार्किंग, भक्तनिवास, स्वच्छतागृह अशा अनेक सुविधांचा अभाव दिसून येत आहे. भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची मागणी होत होती. तत्कालीन आघाडी सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची घोषणा करत दहा कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली होती. पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/vuJw-wAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬