[kolhapur] - थर्माकोल व्यवसायिकाला पाच हजारांचा दंड

  |   Kolhapurnews

नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरगुती गणपतीसमोरील सजावटीसाठी बंदी असूनही बाजारात राजरोसपणे थर्माकोल विक्री सुरु आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी दाखल केल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने बुधवारी दंडात्मक कारवाई केली. लक्ष्मीपुरी येथील गुरुनानक रेफ्रीजेशन फर्मच्या मालकाला थर्माकोल विक्रीबाबत पाच हजार रुपयांचा दंड करत थर्माकोल विक्रीवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले.

राज्य सरकारने २३ मार्च रोजी प्लास्टिक व थर्माकोल वापरांवर बंदी घातली. मात्र या निर्णयाची योग्यरितीने अंमलबजावणी होत नसल्याने शहरात आजही प्लास्टिक व थर्माकोलची विक्री राजरोसपणे सुरू आहे. सध्या सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागलेले असताना, आरास तयार करण्यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये लगबग सुरू आहे. सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा वापर केला जात असल्याने विक्रीही जोरात सुरू आहे. महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या पिछाडीच्या बाजूसह शहरात अनेक ठिकाणी थर्माकोल विक्री सुरु असताना प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले होते. परिणामी विशेषत: थर्माकोल बंदीचा फज्जा उडाल्याचे दिसत होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/BhmP2wAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬