[kolhapur] - ‘पंचायत राज’कडून झाडाझडती

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचायत राज समितीच्या दौऱ्याचा पहिला दिवस जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची कसोटी पाहणारा ठरला. विविध विभागाच्या योजनांचा आढावा, कामकाजातील त्रुटीवरून समिती सदस्यांनी काही जणांची झाडाझडती घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी समितीसमोर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनसह अन्य प्रकल्पांसाठी जादा निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेतील वर्ग एकच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असून त्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणले. गुरुवारी सकाळी पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळांची तपासणी करण्यात येणार असून, समितीच्या तपासणीमुळे तालुकास्तरावर प्रशासन गतिमान झाले आहे.

पंचायत राज समितीमार्फत सकाळी अकरा ते सायंकाळपर्यंत समिती सभागृहात कामकाजांचा लेखाजोखा सुरू होता. समिती सभागृहात अधिकाऱ्यांची परीक्षा आणि सभागृहाबाहेर उपस्थित अन्य अधिकाऱ्यांची कधी कोणत्या विषयावरून समितीला सामोरे जावे लागणार यावरून घालमेल सुरू होती. २०१३-१४ च्या लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या संबंधांतील परिच्छेदासंर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची समितीसमोर साक्ष झाली. समितीचे प्रमुख सुधीर पारवे यांच्या नेतृत्वाखालील २८ आमदारांचा समितीत समावेश आहे. सकाळी दहा वाजता सर्किट हाउस येथे समितीसोबत जिल्ह्यातील आमदारांची अनौपचारिक चर्चा झाली. याप्रसंगी आमदार सुजित मिणचेकर यांनी समिती सदस्यांची भेट घेतली, तर शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी जिल्हा परिषदेत समिती सदस्यांची भेट घेतली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/37r0YQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬