[kolhapur] - ‘स्वार्थासाठी शिवसेनेचे नुकसान होऊ दिले नाही’

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेली २९ वर्षे शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी कधीही शिवसेनेचे नुकसान होऊ दिले नाही आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा बळीसुद्धा दिला नाही. कारण मी कधीही बेंटेक्ससारखा दिखाऊपणा केला नाही,' असे पत्रक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मी पक्षात कार्यरत आहे. राजकारणातील सर्व चढउतार व कुठलेही पद असो वा नसो सामान्यांसाठी झगडत आहे. याबाबतीत पक्षनेतृत्वाचा माझ्यावर व माझा पक्षावर पूर्ण विश्वास आहे. पक्षप्रमुखांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली. याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 'मातोश्री'चा आदेश अंतिम असतो. मी कधीही पक्षाचे नुकसान केले नाही.'

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Yk7IpQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬