[mumbai] - झोपाळ्याचा गळफास लागून मुलाचा मृत्यू

  |   Mumbainews

नालासोपारा : लहान मुलांवर प्रत्येक क्षणी लक्ष ठेवणं किती महत्त्वाचं असतं याचा प्रत्यय पालकांना वेळोवेळी येत असतो. काही दिवसांपूर्वीचं चेंबूरमध्ये चार वर्षाच्या मुलीचा कोल्ड्रींग समजून फिनेल प्यायल्याने मृत्यू झाला होता. आता नालासोपारामध्ये एक गंभीर घटना समोर आली आहे. बारा वर्षाच्या मुलाचा झोपाळ्याचा गळफास लागून मृत्यू झाला. नालासोपाऱ्यातील पेल्हार बटरवाडा या भागात ही घटना घडली. राकेश यादव असं मयत मुलाचं नाव असून तो सहावीच्या वर्गात शिकत होता. या अशा घटनांमुळे मुलांवरून थोडी जरी नजर हटली तरी काय होऊ शकतं हे दुर्देवाने पुन्हा समोर आलंय.

शाळेतून घरी आल्यानंतर आईच्या जुन्या साडीचा झोपाळा करून तो खेळत होता. खेळता खेळता अचानक फास आवळत गेला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी घरी कुणीही नव्हतं. आई घरी आल्यानंतर घटना उघड झाली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/u9_LSQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬