[nagpur] - आदर्श शिक्षकांचा आंदोलनात सत्कार

  |   Nagpurnews

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने मनपा प्रशासनाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी शिक्षकदिनी मनपाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. प्रशासकिय कार्यक्रमावर ​बहिष्कार घालण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षकांनी मनपाच्या कार्यक्रमाला जाण्याऐवजी आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे आंदोलनस्थळीच त्यांचा सत्कार करण्यात आला. एवढ्यावरच शिक्षकांची नाराजी लपून राहिली नसून, ज्या ८० सेवानिवृत्त शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार होते, त्यापैकी केवळ एकाच ​शिक्षकाने हजेरी लावली. त्यामुळे कवीवर्य सुरेश भट सभागृहात आयोजीत शिक्षक दिन कार्यक्रम पुरता फसला.

रेशीमबागेतील कवीवर्य सुरेश भट सभागृहात मनपातर्फे शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कारार्थीच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कारार्थी ५ शिक्षकांपैकी केवळ एकाच शिक्षकाने या कार्यक्रमाला हजेरी लावली. तर, सेवानिवृत्तांपैकीही केवळ एकाच शिक्षकाने पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमस्थळी आंदोलनकर्त्या शिक्षकांनी शिक्षकांना प्रशासनाकडून मागणीची दखल घेतल्याचे मान्य असेल तर कार्यक्रमाला जावे, अशी विनंती केली. कुणालाही अडविले नाही. तरीही, सात मुख्याध्यापक व शिक्षक भट सभागृहात गेले. यात रवींद्र गावंडे, देविदास भांगे, रजनी देशकर, विजया भांगे व इतरांचा समावेश होता. या सर्व शिक्षकांना संघटनेच्या कलम ५ (ब)प्रमाणे कायमस्वरूपी सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे. संघटनेच्या पुढील कार्यकारिणी बैठकीत या सदस्यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती मनपा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी दिली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/65WNfwAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬