[nagpur] - आयुक्तांचा रजा अर्ज स्थायीकडून अनिणींत

  |   Nagpurnews

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या रजेमुळे गुंडाळाव्या लागलेल्या महासभेनंतर मनपात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. एमएमसी कायद्यानुसार स्थायी समितीला सूचना करून सुटीवर जावे, असे असताना दिलेला सुटीच्या अर्जावर समितीने कुठलाही निर्णय घेतला नाही. तर, राज्य सरकारने बुधवारला यासंदर्भात पत्र जारी करून आयुक्तांची रजा मंजूर केली. तसेच अतिरीक्त प्रभार रवींद्र ठाकरे यांनी सांभाळावा असे निर्देशीत केले आहे.

बुधवारी आयोजित महासभेपूर्वी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी आईच्या वैद्यकीय उपचाराकरिता २१ सप्टेंबरपर्यंत सुटीचा अर्ज दिला. यापूर्वीही आईच्या प्रकृतीच्या कारणास्तव आयुक्त रजेवर गेले होते. त्यावेळीही त्यांच्या अनुपस्थितीमुळे महासभा गुंडाळण्यात आली होती. यावेळीही तसेच झाले. त्यामुळे आयुक्तांविरुद्ध संताप वाढला. कुठलेही कामासाठी आयुक्त नियम सांगतात. त्यामुळे आता रजा अर्ज परवानगी देण्यापूर्वी आयुक्त सुटीवर गेल्याने स्थायी समितीने त्यांच्या सुटीच्या अर्जावर कुठलाही निर्णय घेतला नाही. आईच्या आजाराबद्दल नगरसेवकांना सहानुभूती असल्याची भूमिकाही स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा यांनी बोलून दाखविली. दरम्यान, त्यांच्या सुटीच्या अर्जाबद्दल मनपात संताप वाढत असताना नगरविकास विभागाने त्यांचा ३ ते २१ सप्टेंबरपर्यंतची १८ दिवसाची रजा आणि २२ व २३ सप्टेंबर या चौथ्या शनिवार व रविवारचा सुटीचा दिवसापर्यंत त्यांना मुख्यालय सोडण्यास परवानगी दिली. तसेच त्यांच्या पदभार अतिरीक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी त्यांचा मुळ पदाचा कार्यभार सांभाळावा, असे पत्र जारी केले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/XVZ-uQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬