[nagpur] - 'बाइक एक, आदमी तीन. बहुत नाइंसाफी है'

  |   Nagpurnews

नागपूर

'बाइक एक, आदमी तीन. बहुत नाइंसाफी है'.... चित्रपटात शोभेल असा डायलॉग...एखाद्या नव्या चित्रपटातील हा डायलॉग असावा असंच कुणालाही वाटेल. मात्र, हा डायलॉग कोणत्याही चित्रपटाचा भाग नसून तो नागपूर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यासाठी लावलेल्या फलकावर लिहिण्यात आला आहे. शोले चित्रपटातील हा गब्बर ट्रिपल सिट दुचाकीधारकांकडे बघत हा डायलॉग म्हणत असल्याचं पोलिसांच्या पोस्टरवर दाखवण्यात आलंय. हे पोस्टर नागपूर शहरात आणि ट्विटरवर अत्यंत लोकप्रिय ठरल्याचं नागपूर वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी माहिती देताना सांगितले.

हे पोस्टर ट्विटरवर पोस्ट करण्यात आलंय. याबरोबरच सिग्नलवर पोस्टर आणि व्हिडिओ दाखवून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती डीसीपी रोशन यांनी दिलीय. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होऊ नये हाच यामागचा उद्देश असल्याचं रोशन म्हणाले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PolkRgAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬