[nagpur] - वाहतूक पोलिसांनी वाचविले ४८ जनावरांचे प्राण

  |   Nagpurnews

म.टा. वृत्तसेवा, नागपूर

भोपाळ येथून हैदराबाद येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या ४८ जनावरांचे प्राण वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने वाचले. पोलिसांनी पाठलाग करून नंदनवन भागात ट्रकला अडवून जनावरांची सुटका केली. पोलिसांनी अली खान रफिक खान ,शहजाद अली नूरअली ,शाईन खान अजगर अली खान व बन्नू बिलास खान या चौघांना अटक केली.

वाहतूक विभागाच्या इंदोरा शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक ओमप्रकाश कोठे, हेडकॉन्स्टेबल सुनील यादव, शिपाई संजय नगराळे, विकास उईके ,नीलेश, धीरज, सुशील व लवकुश हे कळमना भागात गस्त घालत होते. याचदरम्यान एमपी ०९ एचएफ ८१९१ या क्रमांकाच्या ट्रकमधून जनावरे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती कोठे यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यासह कळमना भागात सापळा रचला. ट्रक दिसताच चालकाला ट्रक थांबविण्याचा इशारा केला. चालकाने ट्रकचा वेग वाढविला. वाहतूक पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केला. याचदरम्यान नंदनवन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक चव्हाण यांना घटनेची माहिती दिली.चव्हाण यांनी नंदनवनमधील रिंग रोडवर नाका बंदी करून ट्रक अडविला. जनावारांची सुटका करून ट्रक जप्त केला व चौघांना अटक केली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/rMS6ogAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬