[nashik] - कौशल्य प्राप्तीतून स्मार्ट व्हा!

  |   Nashiknews

तुकाराम मुंढे यांचे तरुणांना आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पारंपारिक शिक्षणासोबत प्रत्येकाकडे कौशल्य असल्यास रोजगार किंवा स्वयंरोजगार सहज प्राप्त करता येतो. नाशिक स्मार्ट होत असतांनाच तरुणांचे जीवन स्मार्ट होणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीत तरुणांनी आपल्या आवडीचे क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करून स्मार्ट व्हावे, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कौशल्य विकास कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

शहरातील युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने महानगरपालिका, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन व राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या वतीने कालिदास कलामंदिरात तीन दिवसायी स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळेस आयुक्त मुंढे यांच्या हस्ते बुधवारी प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, कौशल्य विकास रोजगार विभागाचे उपसंचालक सुनील सैंदाणे, सहायक संचालक संपत चाटे आदी उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत दोन हजार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे असून कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांचा जाणून घेतला जाणार आहे. कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांची गरज आहे. कुठलाही व्यवसाय करताना गुणवत्ता व व्यावसायिकता विकसित करणे गरजेचे आहे. यातून समाजात स्थान निर्माण होत आहे, असेही मुंढे यांनी सांगितले. दरम्यान गुरुवारी (दि. ६) सिडको विभागात सातपूर तर शुक्रवारी (दि. ७) पश्‍चिम व नाशिकरोड विभागासाठी कार्यशाळा होईल....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/9xS0pwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬