[nashik] - ट्रकभर खाद्यपदार्थ फेकले रस्त्यावर

  |   Nashiknews

मुदतबाह्य असताना पडले मुलांच्या हातात

महापालिकेसह 'एफडीए'चे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुदत संपलेल्या लहान मुलांच्या खाद्य पदार्थाचा ट्रकच अज्ञात व्यक्तीने पंचवटी अमरधाम येथील रस्त्यावर टाकून पोबारा केला. खाद्यपदार्थांचे पॅकेट रस्त्यावर असल्याने या भागातील लहान मुलांनी पर्वणी साधली. मुदतबाह्य अन्नपदार्थांचे सेवन केल्याने मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. संबंधित व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पंचवटी अमरधाम येथून तपोवनात जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास ट्रकभर खाद्य पदार्थांचे पॅकेट रस्त्यावर टाकण्यात आले होते. यात स्कूल मस्ती, हलकेफुलके, डायए चिवडा, व्हिल्स, वेफर्स अशी नावे असलेल्या शेकडो पॅकेटचा समावेश होता. या पॅकेटच्या अन्न पदार्थांची मुदत २०१७ मध्येच संपलेली असून, हा साठा नष्ट करण्याच्या हेतूने संबंधित व्यक्तीने रस्त्यावर फेकला. यामुळे मानवी तसेच प्राणी जीविताला धोका होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. याबाबत दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकास शोधून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/mFBxgwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬