[nashik] - संत सेना पुण्यतिथीनिमित्तसिडकोत विविध कार्यक्रम

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिडको परिसर नाभिक समाज मंडळाच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्ताने विविध कार्यक्रम आणि उपक्रम होणार आहेत. हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा, पालखी मिरवणूक तसेच मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

तोरणानगर येथील श्री संत सेना भवनमध्ये हरिनाम सप्ताहाला सुरूवात झाली आहे. ह.भ.प प्रतिभा सोनवणे, ह. भ. प दत्ता महाराज वाघ, ह. भ. प सुधाकर वाघ, ह. भ. प भूषण महाराज पाटील यांनी कीर्तनसेवा दिली आहे. दररोज सायंकाळी आठ ते दहा या वेळेत हा सोहळा होतो आहे. याखेरीज दुपारी चार ते पाच यावेळेत ह.भ.प श्रीपाद महाराज कुलकर्णी यांचे पसायदानावर प्रवचन सुरू आहे. शुक्रवारी श्री संत सेना महाराज पुण्यतिथीदिनी ह.भ.प चंद्रकांत मोरे यांच्या काल्याच्या कीर्तनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. शुक्रवारी (दि. ७) सकाळी ९ ते १२ यावेळेत सिडको परिसरातून श्री संत सेना महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. याच दरम्यान दुपारी एकपर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अमित धांडे नेत्र तपासणी करणार आहेत. दुपारी एक ते तीन यावेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर निकम, महारू हिरे, सुरेश बोरसे, सोपान सोनवणे, राजेंद्र आहिरे, सुधाकर गायकवाड, अशोक ईशी, मनिषा हिरे, ज्योती शिरसाठ आदी परिश्रम घेत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/7FycSgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬