[nashik] - सिन्नरही ‘उज्ज्वल’

  |   Nashiknews

घरोघरी गॅस आल्याने मालगाव, निफाड तालुके केरोसिनमुक्ती

Tweet : BidvePravinMT

नाशिक : जिल्ह्याला केरोसिनमुक्त करण्याच्या आणि पर्यावरण स्नेह जपण्याच्या दिशेने नाशिकने एक पाऊल पुढे टाकले आहे. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील १ लाख ४६ हजार लाभार्थींना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस मिळू लागल्याने आपसूकच केरोसिनची गरज संपुष्टात येऊ लागली आहे. मालेगाव आणि निफाड पाठोपाठ सिन्नरही केरोसिनमुक्त करण्यात यश आले असून धूरमुक्तीच्या दिशेने या तालुक्यांची पाऊले पडू लागली आहेत.

केरोसिन असो किंवा सरपण यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. दारिद्रय रेषखालील कुटुंबाचा रहाणीमानाचा दर्जा उंचावतानाच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागावा यासाठी पंतप्रधान उज्जवल गॅस योजनेची घोषणा करण्यात आली. १ मे २०१६ रोजी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून या योजेनेचा प्रारंभ झाला. दारिद्रय रेषेखालील व्यक्तींना केवळ १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारावर हे कनेक्शन दिले जाऊ लागले. त्यासाठी प्रत्येक गॅस कनेक्शनसाठी १६०० रुपयांचा खर्च सरकार करीत आहे. जिल्ह्यात सव्वा दोन वर्षांमध्ये दारिद्रय रेषेखालील तब्बल १ लाख ४६ हजार कुटुंबांना या योजनेतून गॅस कनेक्शनचा लाभ दिला गेला आहे. त्यामुळे केरोसिनसाठी हेलपाटे मारण्याच्या तसेच लाकडे गोळा करून आणण्याच्या कटकटीपासून महिलावर्गाची सुटका झाली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fPyZVQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬