[navi-mumbai] - इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीवर महिनाभर बलात्कार

  |   Navi-Mumbainews

घरात डांबून आक्षेपार्ह क्लिप

पळू नये म्हणून कपडे फाडले, टक्कल केले

ओशिवरा पोलिसांकडून बलात्काऱ्यास अटक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

पुणे येथे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला मुंबईमध्ये बोलावून तिला महिनाभर घरात डांबून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार ओशिवरा येथे उघडकीस आला आहे. ओशिवरा पोलिसांनी याप्रकरणी सय्यद आमिर मन्सूर हुसेन उर्फ शिरोज याला अटक केली असून सय्यद याने तिच्या सुमारे ४० अश्लील क्लिप बनविल्याचे समोर आले आहे. ही तरुणी घरातून पळून जाऊ नये यासाठी सय्यद याने तिचे कपडे फाडून टाकले, केस कापून तिचे टक्कल केले. सय्यद याच्या आईसमोरच महिनाभर हा घृणास्पद प्रकार सुरू होता. त्यामुळे तिचा यात सहभाग आहे का, याचाही तपास पोलिस करीत आहेत.

सय्यद आणि या तरुणीची ओळख काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर झाली. त्यांच्यात चांगली मैत्री जमली. जुलै महिन्यात सय्यद याने तिला ओशिवरा येथील घरी जेवायला बोलाविले. जेवून पुन्हा पुण्याला जात असताना तिला रात्रभर थांबण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी ती निघाली त्यावेळी सय्यद याने तिला खोलीत बंद केले. महिनाभर घरात डांबून त्याने बलात्कार केल्याचा तसेच अश्लील क्लिप बनवल्याचा आरोप या तरुणीने तक्रारीत केला आहे. ओशिवरा पोलिसांनी सय्यद याला अटक करून न्यायालयात हजर केली असता त्याला १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-0estwAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬