[navi-mumbai] - ‘एक्स्प्रेस वे’ टोलबाबत लवकरच निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वरील टोलवसुली पूर्णपणे बंद करणे किंवा अंशत: बंद करणे आवश्यक आहे की कंत्राटदार कंपनीला करारनाम्याप्रमाणे टोलवसुली सुरू ठेवू देणे आवश्यक आहे? याबद्दलचा निर्णय राज्य सरकारला उद्या, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला खंडपीठाने ४ जुलैला आदेश देऊन सरकारला ६ सप्टेंबरपर्यंत निर्णय सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच त्याप्रमाणे याविषयीची सुनावणी शुक्रवार, ७ सप्टेंबरला ठेवली होती. आतापर्यंत किती टोल वसूल करण्यात आला आहे, तसेच कंत्राटदार कंपनीने करारनाम्यातील नियम व अटींचा काही भंग केला आहे का, याचाही सरकारने निर्णय घेताना विचार करावा, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले होते. त्यानुसार, सरकारकडून निर्णय सादर होण्याची अपेक्षा आहे....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/U7KAYwAA