[navi-mumbai] - चिक्कीसाठी अट्टहास

  |   Navi-Mumbainews

पौष्टिक आहार देण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांकडून नामंजूर

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याहरीकरिता चिक्कीऐवजी इस्कॉन संस्थेच्या मे. अन्नमित्र फाऊंडेशनद्वारे पौष्टिक आहार देण्याबाबत प्रशासनाने आणलेला ठराव बहुमताच्या जोरावर नामंजूर करत सत्ताधारी राष्ट्रवादीने वादग्रस्त चिक्कीपुरवठा करण्याचा हट्ट कायम ठेवला आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्यासाठी आणलेला प्रस्ताव योग्यच असून आयुक्तांनी कोणत्याही हस्तक्षेपाला बळी न पडता पुन्हा पौष्टिक आहार देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली.

सध्या महापालिकेच्या शाळांमध्ये नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्यावतीने पौष्टिक आहार देण्यात येतो. सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांना पौष्टिक आहारासाठी सुमारे ३ कोटी वार्षिक खर्च होत आहे. इस्कॉन संस्था संचालित मे. अन्नमित्र फाऊंडेशनद्वारे सेवाभावी वृत्तीने 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर १३ रुपये ९० पैसे दराने प्रति विद्यार्थी पौष्टिक आहाराचा पुरवठा केला जात आहे. दुसरीकडे महापालिकेच्या शाळेत बालवाडी ते आठवी या प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या ४० हजार ८८६ विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे मोफत मध्यान्ह भोजनाचा पुरवठा केला जात आहे. या आहाराच्या वाटपावर फक्त पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देखरेख ठेऊन तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जातो. याशिवाय महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून शेंगदाणा व राजगिरी चिक्कीचा पुरवठा न्याहरी आहार म्हणून दिला जातो. चिक्कीसाठी प्रति विद्यार्थी सरासरी १२ रुपये शिक्षण विभाग सध्या खर्च करीत आहे. तेवढ्याच किंमतीत चिक्कीऐवजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नाश्ता म्हणून पोहे, उपमा यांसारखा पौष्टिक आहार नामांकित संस्थेकडून कमी दरात उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या न्याहरीकरिता पौष्टिक आहार पुरविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यासाठी आयुक्तांनी आपल्या अधिकारात पौष्टिक आहाराचा पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून दरपत्रक मागविले होते. यात इस्कॉन संचालित मे. अन्नमित्र फाऊंडेशनने सर्वात कमी म्हणजे १३ रुपये ९० पैसे प्रति विद्यार्थी दराने अमर्यादित (जेवण) पौष्टिक आहाराचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/umReuQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬