[navi-mumbai] - ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन

  |   Navi-Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

'आभाळमाया', 'काहे दिया परदेस' या लोकप्रिय मालिकांमध्ये आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे बुधवारी, पहाटे झोपेत असताना निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उच्च रक्तदाब तसेच मधुमेह होता. त्यातच त्यांना गेल्या शनिवारी अर्धांगवायूचा झटका आला होता. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी, पहाटे झोपेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

छोट्या पडद्यावरील प्रेमळ 'आजी' अशी त्यांची ओळख होती. 'काहे दिया परदेस' मालिकेतील गौरीच्या आजीची त्यांची भूमिका विशेष गाजली. मालिकेत मोहन जोशी यांच्या बरोबरचे संवाद, त्यांच्यातील भांडणे प्रेक्षकांना आवडली. सध्या 'कुंकू टिकली आणि टॅटू' या मालिकेमध्ये त्या जिजीची भूमिका साकारत होत्या. त्यांच्या या एक्झिटमुळे मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. जोशी यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि तीन नातवंडे असा परिवार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/BwnMKgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬