[navi-mumbai] - मोबाइलचोरांना अटक
नवी मुंबई : मोबाइलवर बोलत जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातील मोबाइल हिसकावणाऱ्या लुटारूंमध्ये दोघा अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी एमआयडीसी भागात मोबाइल हिसकावण्याचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन दुकलीकडून लुटलेले दोन मोबाइल फोन आणि मोटारसायकल जप्त केली आहे.
तडीपारला गुन्हेगाराला अटक
नवी मुंबई : नोव्हेंबर २०१७मध्ये ठाणे, रायगड आणि मुंबई या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार सीबीडी-बेलापूर सेक्टर-२० परिसरात आढळून आल्याने एनआरआय पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सलमान उर्फ सलीम रफिक दौला (२५) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर एनआरआय पोलिस ठाण्यात हत्या व मारामारीसह इतर गुन्हे दाखल असल्याने त्याला तडीपार करण्यात आले होते....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/qoPLRAAA