[pune] - टीईटी अनुत्तीर्णांना मिळणार संधी

  |   Punenews

येत्या जानेवारीत शिक्षकांसाठी होणार विशेष परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी उत्तीर्ण न झाल्याने डोक्यावर सेवा समाप्तीची टांगती तलवार असलेल्या राज्यातील शिक्षकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना सरकारकडून आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. या शिक्षकांसाठी येत्या जानेवारी महिन्यात विशेष टीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन असून, त्याद्वारे या शिक्षकांना आपली 'पात्रता' सिद्ध करता येणार आहे.

टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याच्या निर्णयामुळे सुमारे आठ हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. मार्च २०१९पर्यंत सेवेत असलेल्या व टीईटी उत्तीर्ण न झालेल्या सर्व शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे या शिक्षकांना कोणतीही संधी मिळणार नसल्याने राज्यातील आठ हजार शिक्षकांना घरी बसावे लागण्याची शक्यता होती....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/YBw3gwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬