[pune] - पीएमपीच्या तक्रारी अन् गाऱ्हाणी

  |   Punenews

प्रवाशांनी धरले प्रशासनाला धारेवर; समस्यांचा वाचला पाढा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या काही वर्षांपासून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नवीन बस दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप नवीन बस दाखल झालेल्या नसून, प्रवाशांच्या नशिबी नादुरुस्त, खराब आणि अस्वच्छ बस येत आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. किमान आता तरी नवीन बस येणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. यासह कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन, ज्येष्ठ नागरिकांना पुढच्या दाराने प्रवेश नाकारणे, नियोजनातील ढिसाळ कारभार अशा विविध प्रश्नांचा भडिमार करीत नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

पीएमपी सेवा अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी 'जनसंवादा'चे आयोजन केले होते. टिळक, नगरसेविका नीलिमा खाडे, माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, ज्योत्स्ना एकबोटे आणि रागिनी खडके, पीएमपीच्या अध्यक्ष नयना गुंडे, शहर वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते, 'पीएमपी'चे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर, महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला आदी या वेळी उपस्थित होते. खराब बस मार्गावर आणणे, बस वेळेवर न येणे, मिडी बसच्या समस्या, नादुरुस्त आयटीएमएस प्रणाली, बीआरटी बसची समस्या, ब्रेकडाउन, खराब बसस्थानक, पीएमपी हेल्पलाइन नंबर आदी समस्या नागरिकांनी जनसंवादात मांडल्या....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_ivhmAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬