[pune] - बालवाडी शिक्षिकांचेप्रस्तावित धोरण तयार

  |   Punenews

मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या बालवड्यांमधील शिक्षिकांसाठी प्रशासनाने धोरण तयार केले असून, पुढील आठवड्यात ते स्थायी समितीसमोर पुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. शिक्षिका किती कालावधीपासून सेवेत आहेत, याचे दोन टप्पे तयार करून वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर शिक्षकांप्रमाणे या शिक्षिकांनाही दहा नैमित्तिक रजा तसेच बाळंतपणाची रजा देण्याचे धोरणात प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली.

पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील बालवाड्यांमध्ये ५२१ शिक्षिकांची एकवट वेतनावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना दरमहा ८५०० रुपये मानधन देण्यात येते. पालिकेकडील कामगाराला किमान १५ हजार रुपये पगार, तसेच इतर सेवा-सुविधा मिळत असताना बालवाड्यांच्या शिक्षिकांना तुटपुंजा पगार देण्यात येतो. शिवाय कोणत्याही सुविधा देण्यात येत नाहीत. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या मुख्य सभेच्यावेळी या शिक्षिकांनी नगरसेवकांना गुलाबाचे फूल देऊन आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्यसभेत त्यावर जोरदार चर्चाही झडली. अतिरिक्त आयुक्तांनी यांनी मुख्यसभेत दिलेल्या आश्वासनानुसार शिक्षिकांसाठी धोरण तयार करण्यात आले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/qYMYegAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬