[pune] - बेशिस्त चालकांना पोलिसांचा हिसका

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी,

बेशिस्त वाहन चालकांमुळे कॅम्प परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून 'जम्बो' कारवाई मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सत्तर वाहतूक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी एकाचवेळी कॅम्प परिसरातील रस्त्यावर उतरले होते. त्या अंतर्गत ६९१ वाहनचालकांककडून एक लाख ७९ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

महात्मा गांधी रस्ता, इस्ट स्ट्रीट, नाज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, पूना कॉलेज या ठिकाणी जॅमर, नो-पार्किंग, नो-एंट्री, ट्रीपल सीट, बुलेट सायलेन्सर, अतिक्रमण इत्यादीबाबत कारवाई करण्यात आली. वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते, सहायक पोलिस आयुक्त वाकुडे, लष्कर वाहतूक विभागाचे निरीक्षक, सात उपनिरीक्षक, ६० कर्मचारी आणि पुणे कँटॉन्मेंट बोर्डाचे एक अधिकारी व १२ कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. कॅम्प परिसरात महात्मा गांधी रस्त्यासह बाजारपेठेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यापार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी या परिसरात कारवाई मोहीम राबविली. येत्या काळातही कॅम्प परिसरात अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिस शाखेने कळविले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/bxm_sQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬