[pune] - मूर्ती विरघळवण्यासाठी १०० टन अमोनियम बायकोर्बोनेट

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी १०० टन अमोनियम बायकार्बोनेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. शहरात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या सरासरी पाच लाख गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होत असल्याने त्यांच्या विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेटची आवश्यकता आहे.

शहरात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या उत्सवात सुमारे पाच लाख गणेशमूर्ती या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात. या मूर्ती पाण्यात विरघळत नसून त्यातील रासायनिक रंगांमुळे जलसृष्टीची मोठ्या प्रमाणात हानी होते. महापालिकेने यंदाही या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. या मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात न करता त्यासाठी हौद आणि टाक्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करण्यात येत असल्याचे स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/qqhsCAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬