[pune] - मोरेश्वर नांदुरकर यांचे निधन

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्य क्षेत्रातली आघाडीची संस्था 'रसिक साहित्य'चे संस्थापक-संचालक मोरेश्वर दत्तात्रय नांदुरकर (वय ७५) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक विवाहित मुलगी आणि दोन विवाहित मुले असा परिवार आहे. ज्येष्ठ बंधू व नामवंत प्रकाशक पद्माकर व माधव नांदुरकर यांच्या समवेत भोरहून पुण्यात येऊन गेली सहा दशके त्यांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. नवनवीन पुस्तकांची ओळख करून देणारे, सातत्याने दरमहा प्रकाशित होणारे, घरपोच मिळणारे साहित्य सूची हे मासिक त्यांनी सुरू केले. हे मासिक गेल्या चार दशकांपेक्षा जास्त काळ 'रसिक साहित्य'तर्फे चालवले जाते. वाचनीय, संग्राह्य पुस्तकांची निवड करण्यात वाचकांना मदत करण्यासाठी, तसेच नवे वाचक घडवण्यासाठी साहित्य सूची प्रयत्न करते. त्यांनी सुरू केलेली 'घरपोच वाचन योजना' नवे वाचक निर्माण करणारी आणि असलेल्या वाचकांना प्रेरणा देणारी ठरली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-ca1_QAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬