[pune] - याला सत्तेचा माज म्हणायचा का?

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'तुम्हाला मुलगी पसंत असेल, तर मला कळवा, मी तुमच्यासाठी तिला पळवून आणून तुम्हाला देईल, असे व्यक्तव्य एक आमदार करतो. ही घमेंडीची भाषा असून, त्यांच्या या वक्तव्याला सत्तेचा माज म्हणायचा का?', अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राम कदम आणि भाजपवर टीका केली. त्या वेळी कदम यांच्या व्यक्तव्याचा पवार यांनी निषेध केला.

पुण्यात एका कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्या वेळी कार्यक्रमादरम्यान त्यांनी आमदार राम कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले. अजित पवार म्हणाले, 'भाजपाचे आमदार मुलींना पळवून आणण्याची भाषा करत आहेत. मुलींना काही त्यांचे अधिकार आहेत की नाहीत? मुलांना ज्याप्रमाणे जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे तसाच मुलींनासुद्धा आहे. मुलींना पळवून नेऊ, उचलून घेऊन जाऊ, ही कुठली भाषा? फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये यांची असे बोलण्याची हिंमत होतेच कशी? समाज तरी कसा सहन करतो. ही घमेंडशाहीची, मस्तीची भाषा आहे. हा भाजपच्या आमदारांना सत्तेचा आलेला माज म्हणायचा का?', असा प्रश्‍न उपस्थित करून पवार यांनी भाजपला आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-iPOzwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬