[pune] - राम कदम यांच्याविरोधात आंदोलन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस तसेच पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कदम यांच्या फोटोला 'जोडे मारो आंदोलन' केले; तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले.
आमदार कदम यांनी दहीहंडीच्या उत्सवात 'मुलीची परवानगी नसेल, तरी तिला पळवून आणू', असे विधान केले. यानंतर सर्वच स्तरांतून कदम यांच्या विधानावर टीका केली जात आहे. राष्ट्रवादीच्या वतीने लाल महाल चौकात आमदार कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले व काळे फासण्यात आले. भाजप सराकारच्या धिक्काराच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात दतात्रय धनकवडे, रवींद्र माळवदकर, अशोक राठी, नंदा लोणकर, अश्विनी भागवत, युवक अध्यक्ष राकेश कामठे, मनाली भिलारे, वासंती काकडे, शांतीलाल मिसाळ, प्रदीप देशमुख, रजनी पाचंगे, सुहास उभे, अजय दराडे, उर्मिला गायकवाड, फहिम शेख, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/tJ4sFgAA