[ratnagiri] - रसिक रंगले ‘श्यामरंगा’त

  |   Ratnagirinews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मोगरा फुलला', 'सुंदर ते ध्यान उभा विटेवरी,' 'सहेला रे', 'मोरा पिया मोसे बोलत नाही', 'तोरा मन दर्पण', 'हे सुरांनो चंद्र व्हा', 'हमे तुमसे प्यार कितना' अशा एकापेक्षा एक गीत, अभंग, बंदिशीतून पुणेकर रसिकांवर सप्तसुरांची बरसात झाली. मालकंस, ललत, किरवानी अशा रागांमधील बंदिशी, सोबतीला उपशास्त्रीय आणि सुगम संगीतातील गाणी आणि रंगमंचावर चित्रांद्वारे साकारलेल्या श्रीकृष्णाच्या छटा, असा विविध कलांचा आस्वाद घेत रसिकांनी 'श्यामरंग' या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली.

कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने नवी पेठेतील पत्रकार भवनाच्या कमिन्स सभागृहात पुण्यातील डीडी क्लबतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रसिकांनी शास्त्रीय-सुगमच्या मिलाफाची अनोखी मैफल अनुभवली. गानसरस्वती किशोरीताई अमोणकरांचा वरदहस्त लाभलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध गायिका मेघना भावे-देसाई यांच्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रशांत पांडव (तबला), निनाद सोलापूरकर (सिंथेसायझर व गायन), उदय शहापूरकर (हार्मोनियम), नीलेश देशपांडे (बासरी), नरेंद्र काळे (तालवाद्य) यांनी सुरेल साथसांगत केली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Io0gGgAA

📲 Get Ratnagiri News on Whatsapp 💬