[thane] - ऐरोलीतील रस्त्याची महापौरांकडून पाहणी

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

मुंब्रा बायपास रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अवजड वाहतूक नवी मुंबई मार्गे वळवण्यात आली आहे. नऊ महिन्यांपासून सुरू असणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर मार्गावर पटणी कंपनीपासून दिवा गाव सर्कलपर्यंत खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतूक संथ गतीने होते. परिणामी सकाळ-संध्याकाळ येथे वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक व महापौर जयंवत सुतार यांनी ऐरोलीतील दिवा गाव सर्कलपासून पटणी कंपनीपर्यंतच्या रस्त्यांची पाहणी केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० सप्टेंबरपर्यंत मुंब्रा बायपास रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. लकमंत्र्यांनी दिलेल्या मुदतीनंतर नवी मुंबईमार्गे अवजड वाहने वळवू न देण्याचा इशारा आमदार संदीप नाईक यांनी यावेळी दिला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/gi21SAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬