[thane] - थकबाकीदारांवर गुन्हे?

  |   Thanenews

चौफेरी टीकेनंतर केडीएमसीने पाठवल्या नोटिसा

म. टा. खास प्रतिनिधी, कल्याण

केडीएमसीला करापोटी दिलेले तब्बल १९ कोटी ६० लाख रुपयांचे चेक वटले नाहीत, तरी पालिकेचा कर विभाग निष्क्रीय होता. त्यामुळे सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणारा हा विभाग धनाढ्य थकबाकीदारांना पाठीशी घालत असल्याची चौफेर टीका झाली. त्यानंतर अखेर हा विभाग ताळ्यावर आला असून ही रक्कम थकवणाऱ्या थकबाकीदारांविरोधात पालिकेने फौजदारी गुन्हे दाखल करत बँकेतील खाते गोठवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

मागील आर्थिक वर्षात केडीएमसीला मालमत्ता कर किंवा पाणीपट्टीतून मिळणाऱ्या अपेक्षित उत्पन्नाचा आकडा गाठता आला नाही. अपेक्षित उत्पन्न व खर्चातील तफावतीमुळे कल्याण-डोंबिवलीतील विकासकामांना मोठ्या प्रमाणात कात्री लावावी लागली आहे. गेल्या दोन वर्षांत नगरसेवकांना प्रभागातील लहान-मोठ्या कामांनाही निधी मिळालेला नाही. त्यातच स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत आणि अमृत योजनेसाठी निधी उभारण्याची वेळ आल्याने पालिकेचे आर्थिक कंबरडे पार मोडले आहे. स्मार्ट सिटी योजनेत पालिकेने गेल्या दोन वर्षांत १०० कोटी रुपयांचा हिस्सा भरणे अपेक्षित असताना पालिका जेमतेम १५ कोटी रुपये देऊ शकली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/xid2MwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬