[thane] - पाण्याची टाकी धोक्याची

  |   Thanenews

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारी सिद्धेश्वर बाग येथील २ द. ल. लि. क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा पाइप फुटल्यामुळे परिसर जलमय झाला होता. दीड महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्यामुळे या भागातील नागरिकांचा जीव धोक्यात आला होता. पावसाळ्यामध्येही पाणी न साचणाऱ्या या भागातील घरे या पाइपफुटीमुळे जलमय झाली होती. महापालिका प्रशासनाकडून या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी त्यामुळेही या भागात पाणीटंचाई निर्माण झाली होती. या परिसराकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे या भागात मद्यपींचा विळखा असून या भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या भागात असलेल्या वृक्षप्राधिकरण विभागाच्या कार्यालयालाही या आपत्तीचा फटका सहन करावा लागत आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/GbHLyAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬