[thane] - महावितरणचा अधिकारी निलंबित

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

ग्राहकाची वीजचोरी पकडल्यानंतर त्याच्या वीजबिलाची रक्कम कमी करणे, महावितरणच्या एका अधिकाऱ्याला भारी पडले आहे. या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईनंतर वीजचोर आणि महावितरण अधिकारी यांच्यातील साटेलोटे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

वीजमीटर 'बायपास' करून मुंब्र्यातील एका हॉटेलमध्ये करण्यात येणारी वीजचोरी महावितरणने पकडली होती. संबंधित ग्राहकाने २४ महिन्यांत तीन लाख ६९ हजार रुपयांची २३ हजार ८२६ युनिटची विजेची चोरी केली होती. या प्रकरणी १६ ऑगस्ट रोजी मुंब्रा पोलिस ठाण्यात ग्राहकाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र वीजबिल सुधारित करून बिलाची रक्कम कमी करण्यात आली होती. बिलात सहा महिन्यांचे चार हजार ३७६ युनिटचे ७७ हजार १९० रुपये इतकी रक्कम दाखवण्यात आली होती. याबाबत चौकशी करण्यात आली आणि चौकशीअंती अतिरिक्त कार्यकारी अभियंता आनंद राठोड यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/hu9LYgAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬