[thane] - राम कदम यांचा सर्वपक्षीयांकडून निषेध

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

भाजप आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात बुधवारी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात जोरदार आंदोलन केले. यावेळी राम कदम यांच्या छायाचित्रांना काळे फासून ते जाळण्यात आले. या आंदोलनात महिला आणि युवती मोठ्या संख्यने सहभागी झाल्या होत्या. राम कदम यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत राम कदम यांना ठाण्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला.

भाजप आमदार राम कदम यांनी सोमवारी घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केले. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. बुधवारी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने 'भाजप आमदार 'रावण' कदम' असे लिहिलेल्या छायाचित्राला काळे फासत आणि चपलांचा मारा करत संताप व्यक्त केला. या आंदोलनात कोपरी-पांचपाखाडी विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील, ठाणे शहर विधानसभा कार्याध्यक्ष विजय भामरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दुसरीकडे भाजप केवळ मते मिळविण्यासाठी रामाचे नाव घेते. मात्र त्यांची वृत्ती रावणसारखी असल्याचे सांगत प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सुमन अग्रवाल यांनी पत्रकाद्वारे कदम यांचा निषेध व्यक्त केला. भाजपच्या राज्यात महिला सुरक्षित नाही, महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे, त्याचे कारण म्हणजे त्यांची नेते मंडळीची मनुवादी वृत्तीची असल्याची टीका अग्रवाल यांनी केली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/OaOs0gAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬