[thane] - वस्तू पडून कामगाराचा मृत्यू

  |   Thanenews

पालघर : बोईसर येथील औद्योगिक वसाहत क्षेत्रातील आरती ड्रग्ज कंपनीत हायड्रा मशीनने उचललेली वजनदार वस्तू अंगावर पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.

औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज प्लॉट क्र. एन १९८ येथील कारखान्यात काम करणाऱ्या कामगार देवेंद्र श्रीचंद यादव (४५, रा. कोलवडे - बोईसर, मूळ राहणार नवपुरा गाव, उत्तरप्रदेश) याचा अपघातात मृत्यू झाला. आरती ड्रग्ज कंपनीत औषधांचा कच्चा माल तयार केला जातो. चार वर्षांपूर्वी कंपनीत झालेल्या स्फोटात अनेकांना जीव गमवावे लागले होते. परंतु त्यानंतरही कंपनीतील सुरक्षेच्या हलगर्जीबाबत कंपनीला औद्योगिक सुरक्षा विभागाने कारवाईचा थेट बडगा उगारला नसल्याने कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. देवेंद्र यादव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तारापूर येथील प्राथमिक आरोग्य क्रेंद्रात पाठविण्यात आले असून अधिक तपास बोईसर पोलिस करीत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-Aw2PQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬