[thane] - संयुक्त पथक कागदावरच!

  |   Thanenews

शहरातील वाहतूककोंडीमुळे ठाणेकर मेटाकुटीला

पालिका आणि वाहतूक पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव

म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे

रस्त्यावरील अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पालिका आणि वाहतूक पोलिसांचे संयुक्त पथक स्थापन करा, असा प्रस्ताव ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने सर्व महापालिकांसमोर ठेवला असला तरी ठाण्यात अशा पथकाच्या स्थापनेची घोषणा जून, २०१५मध्येच झाली होती. रस्त्यांवर अतिक्रमण करून सेकंडहॅण्ड गाड्यांची विक्री करणारे कारमॉल, वाहनांची सजावट करणारी कार डेकोर सेंटर आणि गॅरेज मालकांसह रस्त्यांवर बेकायदा वाहने पार्क करणाऱ्या वाहनांच्या विरोधात हे पथक धडक कारवाई करणार होते. दंडाची रक्कमही १५० ते २० हजार रुपयांपर्यंत ठरविण्यात आली होती. मात्र, पोलिस आणि पालिकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने ना संयुक्त पथक स्थापन झाले ना त्यांनी कुठे कारवाई केली. त्यामुळे वाहतूक शाखेच्या नवा प्रस्तावानुसार संयुक्त कारवाई होईल का आणि त्यातून रस्ते अतिक्रमणमुक्त होतील का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ZsUbCAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬