[thane] - ‘स्वाधार’कडे पाठ!

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

निराधार, निराश्रित, कौटुंबिक संघर्षामधील पीडित महिलांच्या निवासी व्यवस्था, संगोपन करण्यासह त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यात सन २०१५मध्ये 'स्वाधार योजना' आणण्यात आली होती. तर, अनैतिक व्यापारातून मुक्त केलेल्या महिलांसाठी उज्ज्वला योजनाही राज्य सरकारतर्फे राबविली जाते. मात्र स्वाधार योजनेसाठी ठाणे विभागातून गेल्या तीन वर्षांत एकही प्रस्ताव आला नसल्याची माहिती पुढे आली आहे. तर, उज्वला योजनेसाठी केवळ एका संस्थेने प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे सरकारने अनेक चांगल्या योजना आणल्या तरी त्या लोकांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे त्या केवळ कागदोपत्रीच राहत असल्याचे चित्र आहे.

महिला व बालविकास विभागाच्या वतीने स्वाधार योजना व उज्ज्वला योजना राबविण्यात येते. नैसर्गिक आपत्तीत व कौटुंबिक हिंसाचारामध्ये बेघर झालेल्या महिलांसाठी प्रशिक्षण व पुनर्वसनाच्या सुविधा देऊन त्यांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या आधार देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून ६० टक्के व राज्य सरकारकडून ४० टक्के निधी दिला जातो. तर, उज्ज्वला योजनेत लैंगिक शोषण झालेल्या महिला, शरीरविक्रय व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला व मुली यांच्यासाठी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून संगोपन, शिक्षण व प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम करण्यात येते. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून ६० टक्के व राज्य सरकारकडून ३० टक्के व स्वयंसेवी संस्था १० टक्के खर्च करते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/RZApMwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬