[ahmednagar] - छेडछाडीनंतर मुलीसह वडिलांना मारण्याचा प्रयत्न

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

नववीत शिक्षण घेत असलेल्या मुलीचा काही तरुण पाठलाग करून तिची छेड काढत होते. याबाबत मुलगी व मुलीचे वडील तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला येत असतानाच तरुणांनी त्यांचा पाठलाग करून चारचाकी गाडीची तोडफोड करून दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महेश बाळासाहेब कार्ले, सागर शरद झरेकर, बबन जाधव (रा. चास) व इतर सात जण अशा दहा जणांना आरोपी करण्यात आले आहे.

चास येथे राहणारी मुलगी केडगाव येथे इयत्ता नववीत शिक्षणासाठी येते. शाळा सुटल्यानंतर केडगाव येथे क्लासला जाते. त्यानंतर ती गावाकडे परत जात होती. चासमधील महेश कार्ले व त्याचे इतर मित्र मुलीचा पाठलाग करत होते. गेल्या आठ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. या तरुणांचा त्रास वाढल्यानंतर मुलीने याबाबत वडिलांना माहिती दिली. गावातील मुले त्रास देत असल्याने मुलीचे वडील, मुलगी, मुलीचे मामा याबाबत तक्रार करण्यासाठी बुधवारी सायंकाळी कोतवाली पोलिस स्टेशनला येत होते. गावाकडून तक्रार करण्यासाठी येत असताना आरोपींनी बोलेरो गाडीचा पाठलाग सुरू केला. नगर-पुणे महामार्गावर कायनेटिक चौकात गाडी अडवून आरोपींनी बोलेरो जीपची तोडफोड सुरू केली. त्याच परिस्थितीत मुलीच्या मामाने बोलेरो गाडी चालवत भोसले आखाड्याकडे नेली. तोपर्यंत आरोपी मोटारसायकलवरून गाडीचा पाठलाग करत होते. भोसले आखाडा परिसरात गाडी अडवून, गाडीवर दगडफेक करून गाडीची तोडफोड करण्यात आली. गाडीच्या समोरील व पाठीमागील काचा फोडून टाकल्या. त्यानंतर आरोपी पसार झाले. गाडीच्या काचा लागून मुलगी व वडील जखमी झाले. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री कोतवाली पोलिस स्टेशनला येऊन मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. त्यानुसार दहा जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला....

फोटो - http://v.duta.us/V1pI7AAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/BzLaDAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬