[ahmednagar] - ‘नि‌ळवंडे’ कालव्याचे काम पुन्हा बंद पाडले

  |   Ahmednagarnews

सरकारसोबत बैठक होईपर्यंत काम बंदच ठेवण्याचा निर्णय

अकोले : नि‌ळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम बंदिस्त पाइपद्वारेच व्हावे, या मागणीवर ठाम राहात अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे काम पुन्हा बंद पाडले. त्यामुळे मोठ्या फौजफाट्यासह आलेल्या अधिकाऱ्यांना परत जावे लागले. यासंबंधी शेतकऱ्यांची सरकारसोबत बैठक होईपर्यंत काम बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

निळवंडे धरणाचे मुख्य कालवे अकोले तालुक्यापुरते जमिनीखालून बंद लोखंडी पाइपद्वारे न्यावेत, तालुक्याला या कालव्यामधून पाणी देण्यासाठी वितरण व्यवस्था करावी, संपादित जमिनींचे पुनर्मूल्यांकन करून वाढीव पैसे मिळावेत, उच्चस्तरीय कालव्यांसाठी किती पाणी उपलब्ध राहील याबाबत जलसंपदा विभागाने खुलासा करावा, बंद पाइप पद्धतीचे कालवे मंजुरीनंतर प्रचलित कालव्यांसाठी सरकारच्या नावे झालेल्या जमिनी पुन्हा संबंधित शेतकऱ्यांच्या नावे केल्या जाव्यात, कालव्यांचे फेरसर्वेक्षण व्हावे या व इतर मागण्यांसाठी अकोले तालुक्यातील शेतकरी गेल्या पाच-सहा वर्षांपासून लढा देत आहेत. दोनच दिवसांपूर्वी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पार पडली होती. या वेळी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली होती. प्रश्न सोडवणुकीबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/bgg0RAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬