[ahmednagar] - प्लास्टिक कचऱ्यापासून विटांची निर्मिती

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज इंजिनीअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या घनकचऱ्यापासून बांधकामासाठी विटा बनवण्याची किमया केली आहे. या विटांची क्षमता मातीच्या विटांपेक्षा तीन पट अधिक असून त्याची कालमर्यादा शंभर वर्षांपेक्षा अधिक असल्याचा दावा संशोधन प्रमुख यशवंत तोडमल याने केला आहे.

प्लास्टिकच्या घनकचऱ्याचा वापर करून त्यापासून विटा बनवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संस्थेचे कार्यकर्ते यशवंत तोडमल, राहुल झिने, पंकज निमसे, शुभम मिसाळ, शेख वाहेद, सचिन सापते, गायत्री शेवाळे, निकिता कुलट, मयुरी वायकर हे संशोधन करीत होते. हे सर्व विद्यार्थी नेप्ती येथील छत्रपती इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. अखेर त्यांच्या संशोधनाला यश आले असून त्यांनी प्लास्टिकच्या घनकचऱ्यापासून बांधकामासाठी विटा तयार केल्या आहेत. घरगुती तसेच औद्योगिक क्षेत्रातील अनिर्बंध प्लास्टिक वापरामुळे प्लास्टिक कचरा सतत वाढत चालला आहे. मातीच्या विटा ऐवजी सदरील प्लास्टिकच्या विटांचा वापर केल्यास पर्यावरणास खूप मोठा फायदा होऊ शकतो. पुढील दोन-तीन महिन्यात प्लास्टिकपासून पेव्हिंग ब्लॉक, रस्ते निर्मितीसाठीसुद्धा प्रयत्न करणार आहे, असे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/BDOUDAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬