[ahmednagar] - रोहयो गैरव्यवहार; याचिका फेटाळल्या

  |   Ahmednagarnews

नगर : पाथर्डी तालुक्यातील रोजगार हमी घोटाळ्याशी संबंधित अधिकाऱ्यांच्या तेरा याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे यात अडकलेले अधिकारी आणि खासगी व्यक्तींविरुद्ध फौजदारी कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

टंचाईच्या काळात केलेल्या जाणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामांत गैरप्रकार झाला होता. २०११ ते २०१३ या काळात झालेल्या गैरव्यहाराचे प्रकरण उघडकीस आले होते. या कामाशी संबंधित अधिकारी, अभियंते, कंत्राटदार, पोस्टातील अधिकारी यांनी बनावट खाती उघडून निधीचा अपहार केला होता. अशी तक्रार अॅड. हरिहर गर्जे, भागवत नरोटे, अरविंद सोनटक्के २०१३ मध्येच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. हायकोर्टातही याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टाने सहा महिन्यांत चौकशी करून कारवाईचा आदेश दिला होता.

यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी अधिकारी नियुक्त केले. त्यांनी चौकशी करून तत्कालीन तहसीलदार वंदना खरमाळे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, पोस्टाचे अधिकारी, महसूल व या कामाशी संबंधित अन्य अधिकारी-कर्मचारी यांच्यासह कामांचे लाभार्थी मजूर दाखविण्यात आलेल्यांमधील गोपालकृष्ण मंत्री सावकार, रमेश भाऊसाहेब गोरे, सुरेखा रमेश गोरे, दादासाहेब मोरे, विश्वास गर्जे यांच्यासह अनेकांवर ठपका ठेवून फौजदारी कारवाईची शिफारस केली होती....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/l7DwJQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬