[ahmednagar] - शहरातील ७५ हजार विद्यार्थ्यांना लसीकरण

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

गोवर व रुबेला या आजारावर नियंत्रण करण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये २७ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर याकाळात तब्बल ७५ हजार ७९६ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. १६ जानेवारीपर्यंत महापालिका हद्दीतील नऊ महिने ते पंधरा वर्ष दरम्यान असणाऱ्या १ लाख २५ हजार ६७० मुलांना गोवर आणि रुबेला लस देण्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी एकूण नऊ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

सरकारच्या आदेशानुसार गोवर व रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून ही लस शाळा, सामुदायिक सत्र, अंगणवाडी केंद्र आणि सरकारी आरोग्य केंद्रावर टोचण्यात येत आहे. गोवरचे दुरीकरण आणि रुबेलाचे नियंत्रण करण्यासाठी नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना ही लस देण्यात येते. नगर महापालिका हद्दीमध्ये या वयोगटातील जवळपास सव्वा लाख बालके आहेत. या सर्वांना लस देण्याचे दृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन केले असून आतापर्यंत जवळपास ७५ हजार ७९६ बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील १५ हजार ४५६, पाच वर्षे ते दहा वर्षे वयोगटातील २७ हजार १०८ आणि दहा वर्षे ते पंधरा वर्षे वयोगटातील ३३ हजार २३२ बालकांचा समावेश आहे. महात्मा फुले आरोग्य केंद्र, तोफखाना आरोग्य केंद्र, जिजामाता आरोग्य केंद्र, केडगाव आरोग्य केंद्र, नागापूर आरोग्य केंद्र, मुकुंदनगर आरोग्य केंद्र यासह सिव्हिल हॉस्पिटल व कँटोन्मेंट हॉस्पिटल येथे गोवर-रुबेला लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नगर शहरातील अंगणवाडी केंद्रामध्येही सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत बालकांचे लसीकरण केले जाणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/P_PZPQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬